लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी कार्यालयात नवे नियम लागू केलेत. हे नियम चांगले असल्याचे तिचा फायदा होण्याचे संकेत मिळत आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये पान, गुटखा आणि सिगारेटवर मुख्यमंत्र्यांनी बंदी केली आहे.
उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कार्यालय जवळील लोक भवन इमारतीची पाहाणी केली. एका भिंतीवर त्यांना पान खाऊन थुंकल्याचे डाग दिसल्यावर त्यांनी तात्काळ हा आदेश लागू केला. तसेच रोडरोमिंना अटकाव करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांतून याचे स्वागत होत आहे.
योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशातल्या सर्व शासकीय इमारतींमध्ये पॉलिथीन पिशव्यांवरही बंदी आणली आहे. या आदेशानंतर तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवरचा आदेशही काढला. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालय परिसरापासून ५०० मीटर्सपर्यंत तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. ही बंदी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांनी लागू केली.