पद्म पुरस्कार जाहीर, उज्ज्वल निकम यांना पद्मश्री

पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, एकूण ११८ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Updated: Jan 25, 2016, 03:37 PM IST
पद्म पुरस्कार जाहीर, उज्ज्वल निकम यांना पद्मश्री title=

नवी दिल्ली : पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, एकूण ११८ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

धुळ्याचे शिल्पकार राम सुतार यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच उद्योजक धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात येणार आहे.

रामोजी राव, जगमोहन, रजनीकांत, श्री श्री रविशंकर, यामिनी कृ्ष्णमूर्ती, गिरीजादेवी, पालनजी शापूरजी मिस्त्री यांना पद्मविभूषण, तर राजमौली, मधूर भांडारकर, उदीत नारायण, अनुपम खेर, विनोद राय, सायना नेहवाल, सानिया मिर्झा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय.

अजय देवगण, प्रियांका चोप्रा, अनुपम खेर, विनोद राय यांना पद्मश्री देण्यात येणार आहे.