नवी दिल्ली : पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीमुळे देशात वाढणाऱ्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी आता भारताने सुरक्षेच्या संदर्भात काही कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत पाकिस्तानी सीमेच्या काही भागांवर लेझरचे कुंपण लावणार आहे.
इस्राइल सारख्या देशात पॅलेस्टिनी लोकांची घुसखोरी थांबवण्यासाठी अशा प्रकारचे नियोजन केले गेले आहे. सीमा सुरक्षा दलातर्फे या प्रकारची यंत्रणा भारतासाठी निर्माण करण्यात येत आहे.
या सुरक्षा योजने अंतर्गत सीमेवर लेझरचे जाळे उभारले जाईल. यातून जेव्हा एखादी वस्तू जाईल तेव्हा लेझर किरणांत अडथळा येईल आणि एक अलार्म जोरात वाजेल. ज्यामुळे उपस्थित सैनिकांना संदेश जाईल.
याचप्रमाणे जमिनीखालून बोगदे बनवणाऱ्यांना आळा घालण्यासाठीही काही उपाययोजना सरकार आखत आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता घुसखोरी रोखण्यासाठी सरकार काही ठोस उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात आहे.