पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा मृत्यू...

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा अखेर चंदीगडच्या पीजीआय हॉस्पीटलमध्ये मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 9, 2013, 10:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंदीगड
पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा अखेर चंदीगडच्या पीजीआय हॉस्पीटलमध्ये मृत्यू झालाय. सरबजीत सिंग यांचा लाहोरमध्ये मृत्यू झाला त्याच दिवशी, ३ मे रोजी सनाउल्लाहला मारहाण झाली होती. त्याच्यावर चंदीगडच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गेले काही दिवस तो अत्यवस्थ होता.
जम्मूमध्ये कोट बलावल जेलमध्ये झालेल्या हाणामारीत सनाउल्लाह गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर याच जेलमध्ये असलेल्या इतर कैद्यांकडून हातोड्याने हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानात सरबजीतवर झालेल्या हल्ल्याची ही प्रतिक्रिया होती, अशी शंका त्यानंतर व्यक्त करण्यात आली होती.

सनाउल्लाह याला १९९९ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या सियाल कोटचा निवासी असलेला सनाउल्लाह टाडा कायद्याअंतर्गत दोषी आढळला होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेली १७ वर्षं भारतीय कैदेत होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.