नवी दिल्ली : चितरालहून इस्लामाबाद जाणारं पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला अपघात झाला आहे. या विमानात 40 प्रवासी होते, पीके 661 हे एबटाबादजवळ अपघातग्रस्त झालं, एबटाबादजवळ विमान पोहोचलं पण त्याचा रडारशी संपर्क तुटला.
पाकिस्तान एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 40 प्रवासी आणि 4 ते 5 चालक दलाचे सदस्य असणारं हे विमान होतं. या विमानाने चितरालहून दुपारी 3 वाजता उड्डाण केलं होतं.
मात्र साडेचार वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. एबटाबादच्या हवेलियां भागात हे विमान क्रॅश झालं. हवेलिया हा पहाडी भाग आहे, यात ऑर्डनन्स फॅक्टरी आहे.
एबटाबादमध्येच अमेरिकेने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फडशा पाडला होता.