मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा

 भारतच्या मोदी सरकारने सुशासनच्या चर्चा पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात गाजत आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मिरातील जनतेला मोदींच्या कामांची भूरळ पडली आहे. त्यामुळे त्यांना भारतात येण्याची इच्छा झाली आहे. 

Updated: Sep 2, 2015, 07:27 PM IST
मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा  title=

नवी दिल्ली :  भारतच्या मोदी सरकारने सुशासनच्या चर्चा पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात गाजत आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मिरातील जनतेला मोदींच्या कामांची भूरळ पडली आहे. त्यामुळे त्यांना भारतात येण्याची इच्छा झाली आहे. 

अंजुमन मिनहास-ए-रसूलचे चेअरमन मौलाना सैय्यद अथर देहलवीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. देहलवीने म्हटले की पीओकेतील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वापासून खूश आहेत. मोदींवर भरोसा वाढत आहे. पीओकेतील ९९ टक्के जनतेला भारतात सामील व्हायचं आहे. 

अधिक वाचा : भाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित

 

देहलवी यांनी सांगितले की, पीओकेच्या जनतेचे म्हणणे आहे की, जेव्हा आमचे घरदार पाण्यात वाहून जात होते, त्यावेळी भारतीय लष्कर देवदूत म्हणून आले होते. त्यामुळे तेथील जनता या गोष्टी खूप प्रशंसा करीत आहे. मोदी जम्मू-काश्मीरात सुशासन आणण्याचा प्रयत्न करीत आहे. 

पीओकेत २०१५ मध्ये आलेला भूकंप आणि २०१४ मध्ये आलेला महापूर यात भारतीय लष्कराने केलेली मदत यामुळे तेथील जनतेच्या मनात भारत प्रति सकारात्मक दृष्टीकोन वाढत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.