शेतकरी समस्या मांडत होते, अधिकारी कॅण्डी क्रश खेळत होती

तामिळनाडू सरकारच्या एका महिला अधिकारी वादात आली आहे. ऊस आणि कारखान्याशी संबंधित तक्रारी शेतकरी मांडत होते, एक महिला अधिकारी आपल्या स्मार्ट फोनमध्ये रमली होती.

Updated: Sep 2, 2015, 07:13 PM IST
शेतकरी समस्या मांडत होते, अधिकारी कॅण्डी क्रश खेळत होती title=

चेन्नई : तामिळनाडू सरकारच्या एका महिला अधिकारी वादात आली आहे. ऊस आणि कारखान्याशी संबंधित तक्रारी शेतकरी मांडत होते, एक महिला अधिकारी आपल्या स्मार्ट फोनमध्ये रमली होती.

एकाने या महिला अधिकाऱ्याच्या मागे जाऊन पाहिलं, नेमकं मॅडम काय करताय, तर ती अधिकारी कॅण्डीक्रश खेळत होती. हे दृश्य मोबाईल कॅमेऱयात कैद झाले आहे. रेड पिक्स नावाच्या एका चॅनेलने हा व्हिडीओ जारी केला आहे. या मिटिंगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती हे विशेष.

टीव्ही चॅनेल्सवर हा व्हिडीओ दाखवल्यानंतर सरकारने या महिला अधिकाऱ्याकडून १० दिवसांच्या आत उत्तर मागितलं आहे. कविता हारूर या साखर कारखान्यात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.