लखनऊ : पाकिस्ताने अणू बॉम्बचा वेळप्रसंगी वापर केला जाईल, अशी धमकी दिली होती. याला भारताने चोख उत्तर दिलेय. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणालेत.
पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचा पर्रिकर यांनी समाचार घेतला. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. मी भारताचा संरक्षण मंत्री आहे, पाकिस्तानचा नाही. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास समर्थ आहे, असे पर्रिकर म्हणालेत.
संयुक्त राष्ट्रात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड जकीऊर रहमान लख्वीला पाकिस्ताने जेलमधून सोडले. याबाबत पाकिस्तावर कारवाई करण्याबाबत भारताने प्रस्तावर मांडला होता. या प्रस्तावाला चीनने रोखले. याबाबत पर्रिकर म्हणालेत, हा विषय माझ्याशी संबंधीत नाही. हा विषय परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाशी संबंधीत आहे.
वन रॅंक, वन पेन्शन याबाबत त्यांनी सांगितले, हा अंतर्गतविभागीय विषय आहे. आमचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी वेळ लागत आहे. मात्र, इतकेच सांगतो, लवकरच आनंदाची बातमी मिळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.