भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त

घुसखोरीविरोधात जोरदार कारवाई करत भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

Updated: May 23, 2017, 04:04 PM IST
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त title=

नौशेरा : घुसखोरीविरोधात जोरदार कारवाई करत भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नौशेरा सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

खोऱ्यातला बर्फ वितळत असल्यामुळे या काळात घुसखोरीचे प्रकार दरवर्षी वाढतात. या घुसखोरीला मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैनिक कव्हरिंग फायर देतात. अशाच एका गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या.

पाहा भारतीय लष्कराच्या कारवाईचा व्हिडिओ