नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती

दहशतवादी नावेदनंतर आज बीएसएफ जवानांनी आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलंय. सैन्य आणि पोलिसांनी उत्तर काश्मीरमधून पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलं. सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.

Updated: Aug 27, 2015, 06:40 PM IST
नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती  title=

नवी दिल्ली: दहशतवादी नावेदनंतर आज बीएसएफ जवानांनी आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलंय. सैन्य आणि पोलिसांनी उत्तर काश्मीरमधून पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलं. सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.

आणखी वाचा - काश्मीरात पकडलेल्या जिवंत दहशतवाद्याचा कबूलनामा

मीडिया रिपोर्टनुसार पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव सज्जाद अहमद सांगितलं जातंय. तो पाकिस्तानच्या मुजफ्फरगढचा राहणारा आहे. त्याचं वय २२ वर्ष आहे. एका महिन्यात भारताला मिळालेलं हे दुसरं यश आहे. दहशतवाद्यांनी उरी सेक्टरमध्ये घुसखोरी केली होती. दहशतवादी लपून बसल्याची सूचना सैन्य आणि पोलिसांना मिळाली आणि त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. 

आणखी वाचा - दहशतवादी नावेदचा खळबळजनक खुलासा 

सुरक्षा रक्षकांना बुधवारी या परिसरात दहशतवाद्यांची एक टीम असल्याची माहिती मिळाल्यानंतर उरी सेक्टरमध्ये एलओसी जवळील रफियाबाद क्षेत्रात पानजलापर्यंत उत्तर काश्मीरमध्ये एक अभियान चालवलं गेलं. 

सेनेतील एका अधिकाऱ्यानं सांगितलं, 'रफियाबादमध्ये अभियानादरम्यान तीन दहशतवादी मारले गेले तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.' आता या दहशतवाद्याला चौकशीसाठी श्रीनगरला नेलं जाणार आहे. 

आणखी वाचा - दहशतवादी नावेदच्या वडिलांनी केली पाकची पोलखोल

पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्याच्या जवळपास तीन आठवड्यांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेदला दोन स्थानिक नागरिकांनी पकडलं होतं. नावेद आणि त्याच्या सहकारऱ्यानं ५ ऑगस्टला उधमपूर जिल्ह्यात चेनानी परिसरात बीएसएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. नावेदचा सहकारी मारला गेला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.