नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला अचानक भेट दिली आणि पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. याभेटीनंतर शरीफ यांनी डॉन दाऊद इब्राहिम याची भेट घेतल्याचे पुढे आलेय. त्यामुळे पाकच्या नितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.
दाऊद इब्राहिमने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतल्याचे वृत्त आईबीएन7 या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेय. मुंबईतील पत्रकार बलजित परमार यांनी तसा दावा केलाय. मोदी यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी शरीफ यांचा खास पाहुणा दाऊद होता. २६डिसेंबर रोजी दाऊद लाहोर शहरात होता. तसेच शरीफ यांच्या नातीच्या विवाह समारंभात दाऊद सहकुटुंब उपस्थित होता.
शरीफ समारंभासाठी भारतातील काही मोठे उद्योगपती आणि मुंबईतील काही व्यक्तीही उपस्थित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परमार यांनी नव्वदच्या दशकात दोन वेळा दुबईमध्ये दाऊदला भेटल्याचा दावा केला होता. दरम्यान छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील दूरध्वनीवरील संवाद मिळविण्यात भारतीय गुप्तचर संस्थांना यश मिळाले आहे.