www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
पाटण्यात रविवारी झालेल्या स्फोटांनंतर भारतीय जनता पक्षाने बिहारच्या नीतीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. नीतीश सरकार सभेच्या ठिकाणी सुरक्षा देण्यात कमी पडल्याचा आरोप यावेळी भाजपने केला. नरेंद्र मोदी यांनी स्फोटांच्या माध्यमातून जीवे मारण्याचा कट रचला होता असेही पक्षाने म्हटले आहे.
पाटण्यात एका पत्रकार परिषेदत बोलताना बिहारचे माजी उप मुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले की, पाटण्यात रविवारी झालेले साखळी बॉम्बस्फोट एका कटाच्या भाग आहे. त्याचा उद्देश गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना संपविण्याचा होता.
सुशील मोदी यांनी नीतीश सरकारवर तोफ डागत म्हटले की, सभेच्या दृष्टीने पुरेशी सुरक्षा व्यवस्था का देण्यात आली नाही. नरेंद्र मोदी ज्या मंचावरून भाषण देणार होते. तेथून केवळ १०० मीटर अंतरावर कमी तीव्रतेचा बॉम्ब स्फोट झाला. कल्पना करा की या व्यासपीठाजवळ झाला असता तर काय झाले असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.