नवी दिल्ली : उत्तराखंडमधल्या गंगोत्री गोमुख येथे अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली. उत्तराखंडात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे.
तिथल्या नॅशनल पार्क भागामध्ये बरेचसे पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडलेत. या नागरिकांना सुरक्षित सोडवण्यासाठी SDRF, पोलीस आणि वनविभाग शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
अडकलेल्या लोकांना नदीवर दोरी बांधून त्याच्या मदतीने सुरक्षित स्थळी आणले जात आहे. शनिवारपासून अथकपणे हे प्रयत्न सुरू आहेत. गंगोत्री नॅशनल हायवे ठप्प झालाय, त्यामुळे गंगोत्री आणि गंगनानी ही पर्यटनस्थळं बंद झाली आहेत.
#WATCH: SDRF & Forest Dept rescues people stranded on Gangotri-Gomukh trek using a rope bridge in Uttarkashi.https://t.co/xRcWx0KEl2
— ANI (@ANI_news) July 19, 2016