आज निवडणुका झाल्या तर दावेदार कोण ?

आधी असहिष्णुतेचा मुद्दा आणि आता जेएनयूमध्ये सुरु झालेल्या वादामुळे मोदी सरकार टीकेचं लक्ष्य ठरलं आहे.

Updated: Feb 19, 2016, 04:13 PM IST
आज निवडणुका झाल्या तर दावेदार कोण ? title=

नवी दिल्ली: आधी असहिष्णुतेचा मुद्दा आणि आता जेएनयूमध्ये सुरु झालेल्या वादामुळे मोदी सरकार टीकेचं लक्ष्य ठरलं आहे. असं असलं तरी आज निवडणुका झाल्या तर मोदीच पंतप्रधान पदासाठी नागरिकांची पहिली पसंती आहे. 

इंडिया टुडे आणि कारव्ही इनसाईट्स यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधानपदासाठी नागरिकांना मोदींना पसंती दिली आहे, तर राहुल गांधी हेच पंतप्रधानपदासाठी मोदींना प्रमुख आव्हान आहेत, असंही या सर्व्हेत समोर आलं आहे. राहुल गांधींची प्रसिद्धी मात्र वाढल्याचं चित्र आहे. 

या सर्व्हेनुसार आत्ता निवडणुका घेतल्या तर भाजप प्रणित एनडीएला 286 जागांवर यश मिळेल, तसंच एनडीएला यंदाही 37 टक्के मतं मिळतील, असं या सर्व्हेतून पुढे आलं आहे. 34 टक्के लोकांना वाटतंय महागाई हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तर 34 टक्के लोकांना भ्रष्टाचार, 7 टक्के लोकांना अर्थव्यवस्था आणि दहशतवाद हे महत्त्वाचे मुद्दे वाटतात.

सर्व्हेनुसार आत्ता निवडणुका झाल्या तर काय होईल ?

युपीएच्या जागा 110 पर्यंत

134 जागा जिंकणाऱ्या एनडीएला उत्तर भारतात 103 जागा

उत्तर भारतात युपीएच्या जागा 6 वरुन 24 होऊ शकतात

दक्षिण भारतात 107 जागा जिंकणाऱ्या एनडीएला 87 जागा

आता निवडणुका झाल्या तर 286 जागा

सर्व्हेमधल्या 40 टक्के लोकांना वाटतं असहिष्णुता मुद्दा नाही

युपीएपेक्षा मोदी सरकारलाच पसंती

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच पसंती