पेट्रोल-डिझेल दर पुन्हा घटले

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल १.३० रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहे. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होणार आहे. 

Updated: Apr 15, 2015, 06:31 PM IST
पेट्रोल-डिझेल दर पुन्हा घटले title=

मुंबई :  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल १.३० रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहे. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होणार आहे. 

विशेष म्हणजे तेल कंपन्यांनी या महिन्याच्या सुरूवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. त्यावेळी कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ४९ पैश्यांनी आणि डिझेलच्या किंमती १.२१ पैशांनी घट केली होती. गेल्या काही दिवसात नैसर्गिक वायूच्या दरात घट झाल्यामुळे ही घट करण्यात आली होती. 

तेल कंपन्यांनी यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दोन वेळा पेट्रोल आणि डिझलच्या दरात वाढ केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने ही कपात करण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.