नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलच्या दरात झालेली ही आठवी दर कपात आहे तर डिझेलच्या दरात चौथी कपात आहे.
यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरात ९१ पैशांनी घट झाली होती. तर डिझेलच्या दरात ८४ पैशांनी कपात झाली होती. पेट्रोल आणि डिझेलची ही दर कपात आज रात्री मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
मुंबईत पेट्रोलचे दर ७०.९५ पैसे आहेत ते साधारणतः ६८ रुपये ९५ पैशांच्या आसपास होण्याची शक्यता आहे. तर डिझेलचे सध्याचे दर ६०.११ पैसे आहेत तर साधारणतः ५८.११ पैसेपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.