पेट्रोल-डिझेलचे दर आज रात्रीपासून पुन्हा उतरणार?

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घटल्यानं तेल कंपन्यांना झालेला फायदा त्यांनी जनतेलाही द्यावा, असं सरकारचं म्हणणं आहे. 

Updated: Dec 31, 2014, 04:02 PM IST
पेट्रोल-डिझेलचे दर आज रात्रीपासून पुन्हा उतरणार? title=

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घटल्यानं तेल कंपन्यांना झालेला फायदा त्यांनी जनतेलाही द्यावा, असं सरकारचं म्हणणं आहे. 

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील क्रूड ऑईल कंपन्यांना आयात किंमतीत 9-10 डॉलर प्रती बॅरलचा फायदा होत असला तरी देशात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर फार मोठ्या प्रमाणात घटणार नाहीत. रुपयाचं मूल्य घटल्यानं इंधनाच्या बॅरलमध्ये मिळणारा फायदाही कमी झालाय. दोन आठवड्यांपूर्वी डॉलरच्या प्रमाणात रुपयाचा दर 61.95 वर होतं. तेच आता 63.26 वर पोहचलंय. 

इंधनांच्या दरात ही घट जाहीर केली गेली तर ही पेट्रोलच्या दरातली सलग नवव्यांदा कपात असेल. तर डिझेलच्या दरांत पाचव्यांदा... 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत बदलतात. प्रत्येक 15 दिवसाला या दरांची समीक्षा होता. भारतामध्ये 80 टक्के तेल परदेशातून आयात केलं जातं... याचे दर डॉलरमध्ये दिले जातात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.