स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना एक खुशखबर मिळालीय. आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होणार आहेत. 

Updated: Aug 14, 2015, 11:14 PM IST
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना एक खुशखबर मिळालीय. आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होणार आहेत. 

तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत आणखी कपात करण्याची घोषणा केलीय. पेट्रोलच्या दरांत १.२७ रुपये प्रति लीटर तर डिझेलच्या दरांत १.१७ रुपये प्रति लिटर कपात करण्यात आलीय. आज रात्री १२ वाजल्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. 

नव्या किंमतीनंतर आता मुंबईत पेट्रोलसाठी ६८.२४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ५०.१२ रुपये प्रति लिटर मोजावे लागतील... तसंच राजधानी दिल्लीत ग्राहकांना डिझेलसाठी ४४.९५ रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलसाठी ६३.२० रुपये मोजावे लागतील.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.