पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता

वाचकांसाठी आज आणखी एक गुडन्यूज आहे... येत्या एक-दोन दिवसांत पेट्रोलचे दरात कपात होण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 24, 2012, 06:24 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
वाचकांसाठी आज आणखी एक गुडन्यूज आहे... येत्या एक-दोन दिवसांत पेट्रोलचे दरात कपात होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०६ डॉलर्सपर्यंत खाली आल्यामुळं त्याचा देशातील पेट्रोल दरावरही परिणाम होतील. केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात आर्थिक सुधारणांच्या दृष्टीनं रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणुकींसारखे काही आक्रमक निर्णय निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत सुधारण्यास मदत झाली असून त्याचा थेट परिणाम रुपयावर झालाय. डॉलरच्या तुलनेत काही अंशी रुपया सुधारलाय. एका डॉलरच्या तुलनेत ५७ रुपयांपर्यंत पोहचलेला रुपया आता ५३ रुपये इतका वधारला आहे.
या सर्वांचा परिणाम पेट्रोलच्या दरावर होणार असून दरकपातीचीही शक्यता आहे. १ ऑक्टोबरपूर्वी होणाऱ्या बैठकीत तेल कंपन्या पेट्रोलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात.