बादल यांचे फोटो बदलले, तरुणीसोबत नको त्या अवस्थेत!

फेसबुकवर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आला आहे. या फोटोत बादल एका तरुण मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 8, 2013, 04:25 PM IST

www.24taas.com, चंडिगढ
फेसबुकवर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आला आहे. या फोटोत बादल एका तरुण मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. या फोटोवरून पंजाबमध्ये गदारोळ माजला आहे.
शिरोमणी अकाली दलच्या हरयाणा विंगच्या बैठकीत या फोटोची निर्भत्सना करण्यात आली. पार्टीचे हरयाणाचे संरक्षण मंत्री जोगिंद्र सिंग अहरवां यांनी यासंदर्भात म्हटलं, की हा संपूर्ण शिख समाजाचा अपमान आहे. शिख समाजाच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. प्रकाश सिंग बादल ज्येष्ठ आणि स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत, असंही ते म्हणाले.

या फोटोत प्रकाश सिंग बादल एका मॉडेलसोबत दिसत आहेत. कम्प्युटर फोटोग्राफीने या फोटोमध्ये बदल करून हा फोटो बनवला गेला आहे. खेड्य़ातील जनतेचा हा फोटो पाहून गैरसमज होण्याची शक्यता असल्याचं बादल यांच्या पार्टीतील मंत्री म्हणत आहेत. हा राजकीय कट असून बादल यांची प्रतिमा खराब करणाऱ्य़ांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली गेली आहे.