डुकरांना जाऊन धडकलं विमान

 स्पाईस जेटमधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव शुक्रवारी डुकरांमुळे धोक्यात आला. विमान रनवेवर लँड होत असताना अचानक काही डुकरांचा कळप रनवेवर आला ज्यामुळे ते विमान त्या डुकरांना जाऊन धडकलं.

Updated: Dec 5, 2015, 01:19 PM IST
डुकरांना जाऊन धडकलं विमान title=

मध्य प्रदेश : स्पाईस जेटमधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव शुक्रवारी डुकरांमुळे धोक्यात आला. विमान रनवेवर लँड होत असताना अचानक काही डुकरांचा कळप रनवेवर आला ज्यामुळे ते विमान त्या डुकरांना जाऊन धडकलं.

जबलपूर एयरपोर्टवर स्पाईस जेटचं क्यू 400 हे विमान डुकरांना धकडल्यानंतर विमानाचं डाव्या बाजूचं लँडीग गेअर खराब झाल्याने विमान रनवेवरून बाजूला गेलं. ज्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. 60 ते 70 डुकरांपैकी 7 डुकरांचा विमानाला धडकल्याने मृत्यू झाला.

स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांच म्हणणं आहे की 'पायलटचं विमानावरचे नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे विमान रनवेवरून बाजूला गेलं.  या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून सर्व यात्री सुरक्षित आहेत.'

रनवेवर अशा प्रकारची जनावरे येणाची घटना वाढली असून काही दिवसांपूर्वीच डीजीसीएने देशातील 20 विमानतळांवर अशा प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.