पंतप्रधानांकडून मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

 मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज ६ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेले लोक तसेच शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

Updated: Nov 26, 2014, 12:03 PM IST
पंतप्रधानांकडून मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली title=

मुंबई :  मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज ६ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेले लोक तसेच शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

आजच्या दिवशी घडलेल्या त्या भयानक हल्ल्यात जीव गमवावा लागलेल्या निष्पाप स्त्री-पुरुषांना मी श्रद्धांजवी वाहतो. तसेच या हल्ल्यात अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांनाही मी नमन करतो.

ते देशातील खरे हिरो आहेत. दहशतवादाशी लढणे आणि समाजातून तो काढूण टाकणे यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत, असेही पंतप्रधनांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११तील हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुरक्षित राज्यासाठी आपण सक्षक्त असल्याचे सांगत पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रांनी सक्षम करू, असेही आश्वासन फडणवीस यांनी दिले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.