नवी दिल्ली : महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जनधन योजना उद्यापासून सुरू होणार आहे, या सरकारी योजनेतून देशातील प्रत्येक कुटुंबात बँकिंग सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी सरकारी आणि खासगी बँकांचीही मदत घेतली जाणार आहे.
सर्व बँकांना ठरवून दिलेल्या भागात कॅम्प लावून खाते उघडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. रिझर्व बँकेची सहकारी कंपनी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या प्रोजेक्टची महत्वाची पार्टनर आहे.
जनधन योजनेचं स्वरूप आणि काय असतील सुविधा?
प्रधानमंत्री जनधन योजना गुरूवारपासून सुरू होईल
आधार कार्ड असेल तर तीन मिनिटात खातं उघडणार
प्रत्येक खात्यासोबत RuPayचं डेबिट कार्ड असेल
RuPay कार्डवर 1 लाख रुपयांचा अपघात विमा असेल
NPCI प्रत्येक RuPay कार्ड सोबत विमा देणार
बँक प्रत्येक खात्यावर 1 रूपयाचा हफ्ता घेऊन विमा देणार
RuPay कार्डच्या वापराने ATM मधून पैशांचा व्यवहार करता येणार
खात्यासाठी मिनिमम बॅलेन्सची गरज नाही
बेसिक मोबाईल फोनवर मोबाईल बँकिंग सुविधा असेल
कोणत्याही प्रकारचा App डाउनलोड करण्याची गरज नाही
*99# डायल करून शिल्लक रक्कम तपासता येणार
ग्राहक 99# डायल करून स्टेटमेंट आणि स्टेटसची माहिती घेऊ शकतील
फोनवरून फक्त 5 हजार रूपयेच ही ट्रासफर करता येतील
फोनवरून देशभरात कुठेही मनी ट्रान्सपर करण्याची सुविधा असेल
सहा महिन्यांपर्यंत ट्रान्झॅक्शन ठिक असेल तर ओव्हर ड्रॉफ्टची सुविधा
सरकारी पेन्शन आणि विमा स्कीम खात्याशी जोडली जाईल
बँक खातं होणार भाग्य विधाता
खाते उघडण्यासाठी देशभरात 60 हजार स्पेशल कॅम्प लावले जातील
25 ऑगस्ट रोजी कँम्प लावण्याची तयारी सुरू करण्यात आली
सरकारी बँकांसोबत खासगी बँकाही सहभागी होतील.
IBA ने खासगी, सरकारी बँकांसोबत योजना केली आहे
सरकारकडून पहिल्याच दिवशी 1 कोटी बँक खाती उघडण्याचं लक्ष्य
सर्व बँकांचा कॉमन एक पेजचा अप्लीकेशन फॉर्म
कसं उघडता येईल बँक खातं?
जवळच्या बँक शाखेतून कॅम्पची माहिती मिळेल
-नज़दीकी बैंक शाखा से कैंप की जानकारी मिलेगी
खाते उघडण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्हावर कॅम्प लागतील
आधार कार्ड असेल तर दुसरं काहीही कागदपत्र लागणार नाही
काही कॅम्पमध्ये आधार कार्ड काढण्याचीही सुविधा असेल
आधारमध्ये दिलेला पत्ता बदलवायचा असेल तर स्वत:च्या हमीने लिहून दिलेला पत्ता लागेल
आधार कार्ड नसेल तर काय लागेल?
मतदान कार्ड
रेशन कार्ड
ड्राइव्हिंग लाइसेंन्स
गॅझेटेड अधिकारीच पत्र
सरपंच यांनी दिलेलं ओळख प्रमाणपत्र
प्रमाणित संस्थेने दिलेलं ओळख प्रमाणपत्र
NREGA चं जॉब कार्ड
वीज किंवा टेलिफोन बील
जन्म किंवा विवाहाचं प्रमाण पत्र
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.