पंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान वाजपेयींचा हा व्हिडिओ व्हायरल

एक खूपच जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हाय़रल होतोय. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गळाभेट घेतांनाचा हा व्हिडिओ आहे.

Updated: Nov 30, 2016, 04:00 PM IST
पंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान वाजपेयींचा हा व्हिडिओ व्हायरल title=

नवी दिल्ली : एक खूपच जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हाय़रल होतोय. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गळाभेट घेतांनाचा हा व्हिडिओ आहे.

१९९८ मधला हा व्हिडिओ आहे जेव्हा भाजप सत्तेत आली होती. आज पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी त्या काळी फक्त एक कार्यकर्ते होते. मोदींना भाजप पक्षाची दोन महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. पहिली म्हणजे लालकृष्ण आडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या यात्रा. दुसरी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा. जी मोदींनी खूप यशस्वीपणे पार पाडली होती. त्यानंतर भाजप १९९८ मध्ये सत्तेत आली होती. १९९८ मधला हा दुर्मिळ व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

पाहा व्हिडिओ