नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसला मोदींचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा काळा पैसा बाळगणाऱ्यांवर जोरदार तोंडसुख घेतलंय. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना सध्या झोपेच्या गोळ्या घ्यावा लागताय. गरीब मात्र आज शांततेनं झोपतोय. याचं कारण आहे नोटा बंदी.

Updated: Nov 14, 2016, 10:44 PM IST
नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसला मोदींचा सवाल title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा काळा पैसा बाळगणाऱ्यांवर जोरदार तोंडसुख घेतलंय. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना सध्या झोपेच्या गोळ्या घ्यावा लागताय. गरीब मात्र आज शांततेनं झोपतोय. याचं कारण आहे नोटा बंदी.

काँग्रेसवरही मोदींनी जोरदार निशाणा साधला. लोकांना त्रास होतोय असं काँग्रेस म्हणत असेल, तर आणीबाणीच्या काळात देशाचा तुरूंग बनला तेव्हा लोकांना त्रास झाला नाही का? काँग्रेसनं आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधींची खूर्ची वाचवण्यासाठी आणीबाणी लावली आणि लोकांना 19 महिने त्रास सहन करावा लागला. माझ्या निर्णयानं लोकांना त्रास होतोय. पण तो त्रास कमी करण्यासाठी सरकार काम करत आहे. तुम्ही काय केलं. असा प्रश्नही त्यांनी काँग्रेसला केला.