खडगपूर: पश्चिम बंगालमधल्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी खडगपूरमध्ये सभा घेत होते.
पंतप्रधानांचं भाषण ऐन रंगात आलं असताना बांग सुरु झाली, यामुळे मोदींनी आपलं भाषण थांबवलं, आणि काही वेळ स्थब्द उभे राहिले. आपल्यामुळे कुणाची पूजाअर्चा आणि प्रार्थना बाधित होऊ नये, म्हणून मी भाषण थांबवलं असं मोदी म्हणाले.
यानंतर मोदींनी परत भाषणाला सुरुवात केली. आम्ही उपाशी राहू, पण तुमच्या खिशातून एक रुपयाही चोरी करणार नाही, असं मोदी म्हणाले.
#WATCH: PM Narendra Modi pauses his speech during Azaan (call to prayer) in Kharagpur (West Bengal).https://t.co/7XYDrf7cmu
— ANI (@ANI_news) March 27, 2016