मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला २ मंत्रिपदं

नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे, कृषी मंत्री राधामोहन यांच्यावर नरेंद्र मोदी नाखूश आहेत, त्यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेण्याची शक्यता आहे. त्यांना ग्रामविकास मंत्रालय देण्यात येणार आहे, सध्या ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार नितिन गडकरी यांच्याकडे आहे.

Updated: Nov 5, 2014, 08:12 PM IST
मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला २ मंत्रिपदं title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे, कृषी मंत्री राधामोहन यांच्यावर नरेंद्र मोदी नाखूश आहेत, त्यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेण्याची शक्यता आहे. त्यांना ग्रामविकास मंत्रालय देण्यात येणार आहे, सध्या ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार नितिन गडकरी यांच्याकडे आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान १४ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत, त्याआधी हा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

 राधामोहन यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेतल्यास कृषी मंत्रालय कुणाला सोपवलं जाईल हे स्पष्ट झालेलं नाही, तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना संरक्षण खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे, त्यांना मोदींनी आज भेटीसाठी दिल्लीत बोलावल्याची चर्चा आहे, तत्पूर्वी मनोहर पर्रिकर यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

शिवसेनेला १ कॅबिनेट, आणि १ राज्यमंत्रिपद
सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणजे शिवसेनेला १ कॅबिनेट, आणि १ राज्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेशी महाराष्ट्रात सामील होण्यावर भाजपची चर्चा सुरू असतांना ही बाब अत्यंत महत्वाची आहे.

प्रकाश जावडेकर यांच्याकडून पर्यावरण मंत्रालय परत घेतलं जाणार आहे. मात्र जावडेकर यांच्याकडे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा पदभार कायम राहणार आहे, मात्र नजमा हेप्तुल्ला यांचं मंत्रिपद जाण्याची दाट शक्यता आहे. नजमा यांच्याकडे सध्या अल्पसंख्याक विकास मंत्रालय आहे.

मोठ मोठ्या मंत्र्यांना त्यांच्या कामाबद्दल तंबी देण्य़ात आली आहे, परफॉर्म करा नाहीतर बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असा इशारा देण्यात आला असला, तरी आणखी 
वेळ या मंत्र्यांना दिला जाणार आहे, मात्र दिलेल्या वेळेत सुधार न झाल्यास बाहेरचा रस्ता या मंत्र्यांसाठी अटळ असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.