पंतप्रधानांनी सांगितलं अवयव दानाचं महत्त्व, टीम इंडियाला मॅचसाठी शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे अवयव दानाचं महत्त्व अधोरेखित केलं. अवयवदानामध्ये तामिळनाडू राज्य आघाडीवर असल्याचा उल्लेख यावेळी नरेंद्र मोदींनी आवर्जून केला. त्याचवेळी झी मीडियानं स्वच्छता अभियानाबाबत घेतलेल्या पुढाकाराचीही मोदींनी यावेळी प्रशंसा केली. 

Updated: Oct 25, 2015, 01:32 PM IST
पंतप्रधानांनी सांगितलं अवयव दानाचं महत्त्व, टीम इंडियाला मॅचसाठी शुभेच्छा! title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे अवयव दानाचं महत्त्व अधोरेखित केलं. अवयवदानामध्ये तामिळनाडू राज्य आघाडीवर असल्याचा उल्लेख यावेळी नरेंद्र मोदींनी आवर्जून केला. त्याचवेळी झी मीडियानं स्वच्छता अभियानाबाबत घेतलेल्या पुढाकाराचीही मोदींनी यावेळी प्रशंसा केली. 

टीम इंडियाला शुभेच्छा

सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचसाठी शुभेच्छा दिल्या. २-२ मॅच जिंकून सीरिज अतिशय रोमांचक वळणावर असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आजची मॅच टीमसाठी खूप महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. 

धनत्रयोदशीपासून सुरू होणार गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६च्या बजेटमध्ये जाहीर केलेली गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम दिवाळीत धनत्रयोदशीपासून सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. 

आपल्या देशात सोनं ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. सोनं हे आर्थिक सुरक्षेचं माध्यम बनलं आहे. त्यामुळंच सोनं हे देशाची संपत्ती बनू शकतं. म्हणूनच बँकेत ठेवण्यात येणाऱ्या सोन्यावर व्याज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसंच येत्या दिवाळीत ५ आणि १० ग्रॅमच्या अशोक चक्राच्या सोन्याचा शिक्काही उपलब्ध होईल, असंही मोदी म्हणाले.

अधिक वाचा - पुढील वर्षापासून छोट्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत: मोदी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.