मोदींना सिद्धूसाठी ट्विट करता येतं पण 'दादरी'बाबत नाही - ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक नवज्योत सिंह सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट केलं. त्यावरूनच ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना टार्गेट केलंय. पंतप्रधानांना सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट करायला वेळ आहे पण अखलाकच्या हत्येबाबत नाही.

Updated: Oct 7, 2015, 04:41 PM IST
मोदींना सिद्धूसाठी ट्विट करता येतं पण 'दादरी'बाबत नाही - ओमर अब्दुल्ला title=

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपचे माजी खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक नवज्योत सिंह सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट केलं. त्यावरूनच ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना टार्गेट केलंय. पंतप्रधानांना सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट करायला वेळ आहे पण अखलाकच्या हत्येबाबत नाही.

आणखी वाचा - दुआ है जल्दी ठीक हो जाओ, तुम योद्धा हो सिद्धू : पंतप्रधान मोदी

ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून हा प्रश्न उपस्थित केलाय.  

२९ सप्टेंबरला गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दिल्लीच्या दादरी भागात अखलाक या ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यावर अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावरून केंद्रातील भाजप सरकारवर विविध स्तरातून टीका केली जातेय. 

आणखी वाचा - नवज्योतसिंग सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.