सोन्यानं मढलेल्या तृतीयपंथीयानं आणले पोलिसांच्या नाकी नऊ...

शहरात एक अजब किस्सा पाहायला मिळाला... एका कलश यात्रेत सोन्यानं मढलेल्या एका किन्नरनं संपूर्ण पोलिसांना हैराण करून सोडलं. 

Updated: Oct 7, 2015, 03:24 PM IST


 

भोपाळ : शहरात एक अजब किस्सा पाहायला मिळाला... एका कलश यात्रेत सोन्यानं मढलेल्या एका किन्नरनं संपूर्ण पोलिसांना हैराण करून सोडलं. 

भोपाळच्या गंजबासौदा भगात राष्ट्रीय किन्नर महापंचायत सुरू आहे. यामध्ये, सहभागी होण्यासाठी देशभरातून जवळपास दीड हजार किन्नर दाखल झालेत. मंगळवार एक कलश यात्राही काढण्यात आली... या दरम्यान, एक किन्नर तब्बल चार किलो सोन्याचे दागिने परिधान करून कलश यात्रेत सामील झालेला दिसला. 

डोक्यावर मुकूट, गळ्यात हार, बांगड्या, बाजुबंद असे दागिने या तृतीयपंथीयानं परिधान केले होते. इतकंच नाही तर त्यानं परिधान केलेल्या साडीतही सोन्याच्या तारा दिसत होत्या. त्यामुळे, संपूर्ण कलश यात्रेत तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. 

पण, डोक्यापासून तळपायापर्यंत सोन्यानं मढलेल्या या किन्नरची सुरक्षा मात्र पोलिसांसाठी डोकंदुखी ठरली. त्यामुळे, पायी चालण्याची परवानगी त्याला नाकारण्यात आली. त्यानंतर ज्या कारमध्ये या किन्नरला बसवण्यात आलं ती गाडी सशस्त्र पोलिसांना घेरावी लागली. 

सोन्यानं मढलेल्या या व्यक्तीला पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी जमा झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.