चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पुरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. याचे काही फोटो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं आपल्या साईटवर टाकले. मात्र यातल्या एका फोटोवर नेटिझन्ससी जोरदार आक्षेप नोंदवला.
बाकीच्या फोटोंमध्ये हेलिकॉप्टरच्या खिडकीमधून दिसणारा भाग धुरकट आणि अस्पष्ट होता. मात्र एका फोटोमध्ये खालच्या इमारती आणि साचलेलं पाणी इतकं स्पष्ट दिसत होतं, की हा फोटो फेक आहे की काय, अशी शंका ट्विटरवर व्यक्त झाली.
नेटवर या प्रकारावर जोरदार टीका झाली आणि त्याची खिल्ली उडवली गेली... अखेर pibनं हा फोटो वेबसाईट आणि ट्विटर हँडलवरून काढून टाकला.
C’mon, @PIB_India. Stay away from Photoshop. pic.twitter.com/VpxHtj7mHG
— Tanvi Madan (@tanvi_madan) December 3, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.