राष्ट्रीय एकात्मतेची शपथ, पंतप्रधानांचा 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत रन फॉर युनिटीच्या शर्यतीमध्ये जनतेबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालेत. दरम्यान महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर युनिटी मॅरेथॉन'मध्ये राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. 

Updated: Oct 31, 2014, 12:26 PM IST
राष्ट्रीय एकात्मतेची शपथ, पंतप्रधानांचा 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग title=

नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत रन फॉर युनिटीच्या शर्यतीमध्ये जनतेबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालेत. दरम्यान महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर युनिटी मॅरेथॉन'मध्ये राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. 

आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकारनं राष्ट्रीय एकदा दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्त देशभरात 'रन फॉर युनिटी'चं आयोजन करण्यात आलंय. यावेळी अर्थ व संरक्षण मंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, दिल्लीचे उप राज्यपाल नजीब जंग हेही उपस्थित होते.

राष्ट्रीय एकते निमित्त विशेष रॅलीचंही आयोजन करण्यात आलंय. मुंबईसह दिल्लीत तसेच देशातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर युनिटी'मध्ये सर्वसामान्यांपासून अनेक सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे 'रन फॉर युनिटी'ला हिरवा झेंडा दाखवून अभियान सुरु केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही हिरवा झेंडा दाखवला.

आर्य चाणक्य यांच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनीच देशाला एकसूत्रात बांधल्याचे सांगच महात्मा गांधी व सरदार पटेल यांची जोडी अद्भुत होती. जी व्यक्ती इतिहास विसरते ती कधीच इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळेच आपण ऐतिहासिक नेत्यांचा विसर पडू देऊ नये, असे मोदी यांनी सांगितले. 

जरी अनेक राज्य असली तरी आपले राष्ट्र एक आहे, देशात अनेक रंग असले तरीही तिरंगा एकच आहे, असे सांगत विविधतेत एकता हीच आपल्या राष्ट्राची ओळख असल्याचे मोदी म्हणालेत. 
आपण सर्व भारतीय जात, धर्म आणि समाज या मर्यादांच्या ओलांडून एकत्र येऊ, अशी शपथही त्यांनी देशवासियांना दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.