काळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?

सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे. 

Updated: Oct 30, 2014, 07:02 PM IST
काळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार? title=

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे. 

तर १३ कॉर्पोरेट आणि ट्रस्टच्या खात्यांचाही समावेश या यादीत आहे. काळंधन बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा जस्टीस एम. बी. शाह यांनी व्यक्त केलीय. 

काळ्याधनाप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख जस्टीस एम. बी. शाह आहेत. या प्रकरणी कारवाईची प्रक्रिया कठीण आहे. पण कारवाई व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. पुढील महिन्यात २७ जणांविरोधात कारवाईची शक्यताही त्यांनी झी मीडियाशी बोलताना बोलून दाखवलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.