पंतप्रधानांचं ट्विटर, फेसबुक अकाऊंट कोण अपडेट करतं? जाणून घ्या...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला डिजीटल इंडियाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं नेहमीच जाणवतं. पण, पंतप्रधान पदावर आरुढ झाल्यानंतर वेगवेगळ्या कामांत गढून गेलेल्या मोदींचं सोशल वेबसाईटचे अकाऊंटस कोण हॅन्डल करत असेल बरं? असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का... जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 

Updated: Dec 25, 2015, 09:06 AM IST
पंतप्रधानांचं ट्विटर, फेसबुक अकाऊंट कोण अपडेट करतं? जाणून घ्या...  title=

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला डिजीटल इंडियाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं नेहमीच जाणवतं. पण, पंतप्रधान पदावर आरुढ झाल्यानंतर वेगवेगळ्या कामांत गढून गेलेल्या मोदींचं सोशल वेबसाईटचे अकाऊंटस कोण हॅन्डल करत असेल बरं? असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का... जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 

आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयानं या प्रश्नाचं उत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल अकाऊंटस ते स्वत: 'मॅनेज' करतात, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलीय.

कोणताही  विशिष्ट अधिकारी पंतप्रधानांचं ऑफिशिअल फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट हाताळत नाही... पण, पंतप्रधानांचं अकाऊंट वेगवेगळ्या अधिकृत माहितींद्वारे अपडेट केलं जातं, असं यात म्हटलं गेलंय. 

परदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधानांना परदेशी भाषांमध्ये ट्विट करायला कोण मदत करतं? या प्रश्नाला मात्र पीएमओकडून उत्तर देण्यात आलेलं नाही. परंतु, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून टेलिप्रॉम्प्टिंगची सुविधा पुरविली जाते, असं यात म्हटलं गेलंय.