उत्तर प्रदेशात मोदींची तिसरी परिवर्तन रॅली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिवर्तन रॅली

Updated: Nov 27, 2016, 09:31 AM IST
उत्तर प्रदेशात मोदींची तिसरी परिवर्तन रॅली title=

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये भाजपची परिवर्तन रॅली होते आहे. दुपारी एक वाजता मोदी या रॅलीत संबोधित करतील. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही तिसरी परिवर्तन रॅली आहे. याआधी 14 आणि 20 नोव्हेंबरला गाजीपूर आणि आग्रामध्ये मोदींची ही रॅली झाली आहे. या रॅलीआधी पंतप्रधान पहिल्या हमसफर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधान मोदी देशवासियांशीही संवाद साधणार आहेत. 26 व्या मन की बातमधून मोदी देशवासियांशी संवाद साधतील. नोटाबंदी आणि सीमेवरील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी बोलतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. गेल्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी भारतीय जवानांना संबोधित केलं होतं.