कॉन्स्टेबलनं मित्रांसोबत मिळून केला १०वीच्या विद्यार्थिनीवर गँगरेप

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथल्या एका पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलनं आपल्या दोन मित्रांसोबत मिळून मोदीनगर भागात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी या गँगरेपचा व्हिडिओ बनवून पीडित मुलीला धमकी दिली की याबाबत कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ इंटरनेटवर टाकू.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 12, 2014, 01:42 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, गाझियाबाद
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथल्या एका पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलनं आपल्या दोन मित्रांसोबत मिळून मोदीनगर भागात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी या गँगरेपचा व्हिडिओ बनवून पीडित मुलीला धमकी दिली की याबाबत कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ इंटरनेटवर टाकू.
शनिवारी पीडित विद्यार्थिनीनं मोदीनगर पोलिसांकडे तिघांविरोधात तक्रार नोंदवली. त्यात विद्यार्थिनीनं हा आरोप केलाय की, ती ४ डिसेंबरला ट्यूशनवरुन घरी परत येत असतांना तिचा शेजारी असलेला करण नावाचा तरुण तिला एका ठिकाणी घेवून गेला आणि तिथं त्याचे केशव आणि नितीन नावाचे दोन मित्र पोहोचले. नितीन हा फैजाबाद पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फैजाबाद पोलीस लाईनमध्ये असलेल्या त्या आरोपी कॉन्स्टेबलला अटक केलीय. घटनेचा तपास सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.