www.24taas.com, झी मीडिया, पणजी
सहकारी महिलेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गोवा पोलिसांनी तरुण तेजपालला अटक केल्यानंतर त्याची ‘पौरुषत्व चाचणी’ करण्यात आली. तेजपालच्या या चाचणीचा निकाल ‘पॉझिटीव्ही’ आलाय. त्यामुळे तेजपालच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
जामीनपूर्व अर्ज फेटाळला गेल्यानं लैंगिक शोषण प्रकरणी गेल्या शनिवारी रात्री ‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टानं त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तरुण तेजपालविरुद्ध ‘तहलका’च्या एका महिला पत्रकारानं लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या तेजपालच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, गोवा कोर्टानं तेजपालला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. त्यानंतर गोवा पोलिसांनी तेजपालला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेऊन त्याची ‘पौरुषत्व आणि रक्त चाचणी’ केली. या चाचणीनंतर तेजपालच्या पौरुषत्वाच्या चाचणीचा रिझल्ट पॉझिटिव्ह आल्याचं इथल्या डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.
या चाचणीनंतर गोवा पोलीस तेजपालाला ज्या हॉटेलमध्ये ‘ती’ घटना घडली तिथं घेऊन जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ७ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर असे दोन वेळा पीडित तरुणीसोबत गैरकृत्य आणि लैंगिक शोषण केलं होतं. ‘तहलका;च्या थिंक फेस्ट या कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये हा प्रकार घडला होता. पुरावे म्हणून पोलिसांनी हॉटेलमधील कॅमेरेही तपासले आहेत. मुख्य म्हणजे ज्या लिफ्टमध्ये हा प्रकार घडला त्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता त्यामुळे तिथलं मात्र फुटेज पोलिसांनी मिळू शकलेलं नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.