प्रँकच्या नावाखाली तरुणीला किस करुन पळणाऱ्या तरुणाला अटक

प्रँक व्हिडीओ बनवण्याच्या नावाखाली तरुणींना किस करुन पळणाऱ्या सुमितला अटक करण्यात आलीये. दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केलीये.

Updated: Jan 13, 2017, 03:58 PM IST
प्रँकच्या नावाखाली तरुणीला किस करुन पळणाऱ्या तरुणाला अटक title=

नवी दिल्ली : प्रँक व्हिडीओ बनवण्याच्या नावाखाली तरुणींना किस करुन पळणाऱ्या सुमितला अटक करण्यात आलीये. दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केलीये.

द क्रेझी सुमित या नावाने हा तरुण यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करत असे. असाच एक व्हिडीओ त्याने यूट्यूबवर टाकला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. 

यात हा तरुण वेगवेगळ्या तरुणींना किस करुन पळून जात असे आणि त्यानंतर प्रँक म्हणून व्हिडीओ अपलोड करत असे. 

मात्र पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान ज्या तरुणींसोबत हा प्रकार घडला त्या या तरुणाच्या परिचयाच्या असल्याचे समोर आलेय. तसेच यूट्यूबवर हिट मिळवण्यासाठी हे सर्व करत असल्याचेही चौकशीतून समोर आलेय.