मुंबई : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवरही पाहायला मिळालाय.
सोमवारी सेन्सेक्स 17.37 अंकांनी घसरलेला दिसला. 25,006.98 वर सेन्सेक्स बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई) दिवसाच्या सुरुवातीला 68.81 अंकांची तेजी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 0.07 टक्क्यंनी म्हणजेच 17.37 अंकांनी घसरत 25,006.98 अंकांवर बंद झाला. बीएसईमध्ये नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.
सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये 280 रुपयांनी घसरण झाली आणि सोनं 28,450 प्रति दहा ग्रॅमवर येऊन पोहचलं. तर चांदीच्या भावांत 400 रुपयांनी घसरण होऊन ती 45,600 रुपयांवर पोहचली. आंतरराष्ट्री स्तरावर मागणी कमी झाल्यानं हा परिणाम जाणवल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.