नवी दिल्ली : महागाईनं होरपळलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोल 89 पैशांनी आणि डिझेल 49 पैशांनी स्वस्त झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक आठवड्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये ही कपात झाली आहे. याआधी 15 जूनला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले होते, तर सहा आठवड्यांमध्ये चारवेळा पेट्रोल-डिझेलची भाववाढ झाली होती. या नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोल 69.32 रुपये तर डिझेल 60 रुपये प्रती लिटर दराने मिळतील.