नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यामध्ये अनेक मंत्र्याचं खाते देखील बदलण्यात आलं आहे. स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते प्रकाश जावडेकरांना देण्यात आलं आहे तर इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.
नव्या मंत्र्यांची पंतप्रधान मोदींनी पहिल्याच दिवशी कान उघडणी देखील केली. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की,
१.'तुम्ही आता स्वागत सत्कारापेक्षा मंत्रालयावर लक्ष द्यावं. आगामी संसदेच्या सत्राची तयारी करा. सेलिब्रेशनला पुढे ही वेळ मिळेल.
२. १५ ऑगस्टनंतर आपल्या मतदारसंघात जावून स्वागत सत्कार करा. मंत्रालयाचं कामकाज लवकरात लवकर मन लावून शिका. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी करा.
३. 'मी विदेशातून येण्यापूर्वी कामकाज शिकून घ्या. मी ही जेव्हा पंतप्रधान झालो तेव्हा सुरुवातीचे ४ महिने मन लावून सगळं काही शिकलो.
४. राज्यमंत्रीची भूमिका या सरकारमध्ये महत्वाची आहे. कामात तेजी आणा. जेव्हाही गरज असेल तेव्हा सरळ मला संपर्क करा. मिळून मिसळून काम करा.
५. मी ४ दिवसासाठी विदेशात जात आहे. तोपर्यंत काम समजून घ्या आणि सांभाळा.
अशा सूचना पहिल्यास दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्र्यांना दिली.