नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला ‘ईद उल फितर’च्या शुभेच्छा दिल्या. हा सण देशातील शांतता, एकता आणि बंधुभावाला आणखीन मजबूत करेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात ‘ईद उल फितरच्या शुभेच्छा... हा पवित्र दिवस आपल्या देशात शांति, एकता आणि बंधुभावाच्या भावनांना आणखीन मजबूत करेन’ असं म्हटलंय. पवित्र रमजान महिना पूर्ण झाल्याचं प्रतिक ईद उल फितर आज देशभर साजरा केला जातोय.
इस्लामिक कॅलेंडरचा नववा पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समुदायाच्या लोकांद्वारे रोजे पाळून साजरा केला जातो. ते या दरम्यान सूर्योद्यापासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न-पाण्यापासून दूर राहतात आणि हा उपवास ईद उल फितरच्या दिवशी संपतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.