नवी दिल्ली: व्हाइट हाऊसमध्ये प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूताकडून दिलं जाणाऱ्या रिसेप्शनचा मेन्यू तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर काही खाणार नाहीयेत. पाच दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचा उपवास करणार आहे. याबद्दलची एक बातमी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय.
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान अमेरिका दौऱ्यात फक्त फलाहार करणार आहेत. पीएमओच्या अधिकाऱ्यानं सांगितलं, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील चार दशकांपासून नवरात्रीत नऊ दिवसही उपवास करतात आणि यावर्षीही ते करणार आहेत. आम्ही पंतप्रधानांचा व्यस्त कार्यक्रम पाहून त्यांना सांगितलं की ज्यूस तरी घ्याल पण त्यांनी अजून यावर हो किंवा नाही सांगितलं नाहीय.’
मोदींच्या दौऱ्यामध्ये न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वॉयर गार्डनमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून एनआरआयनं सांगितलं, “आम्हाला हे सांगितलं गेलंय की पंतप्रधानांचा उपवास असल्याचं लक्षात ठेवून आम्ही कार्यक्रम थकवणारा करणार नाहीय.” मेडिसन स्क्वॉयरवर होणाऱ्या कार्यक्रमाला १८ हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.