प्रियांकाचा रेहान झोपडीतून राजकारणाच्या वाटेवर?

नेहरु- गांधी घराण्याची पाचवी राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हं आहेत. 

Updated: Jul 11, 2015, 02:05 PM IST
प्रियांकाचा रेहान झोपडीतून राजकारणाच्या वाटेवर? title=

अमेठी : नेहरु- गांधी घराण्याची पाचवी राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हं आहेत. 

काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांचा नातू आणि प्रियांका गांधी यांचा पुत्र रेहान यानं मामा राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघाचा दौरा केला. रेहानने आपल्या मित्रासोबत अमेठीची भ्रमंती केली. शिवाय आपल्या मित्रांसोबत गावरान जेवणाचाही आस्वाद घेतला.


रेहान

एका स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या घरामध्ये रेहान रात्रभर वास्तव्यास होता. रेहानने या वेळी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. एका ढाब्यावर जेवण केल्यानंतर तो आपल्या मित्रासोबत गावाचे माजी सरपंच रामअवध पांडे यांच्या घरी गेला. 

विशेष म्हणजे रेहानला राजकारणामध्ये रस आहे. संसदेमधील कामकाजाची माहिती घेतल्यानंतर रेहानने मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. 

सोशल मीडियावर नेहमी अॅक्‍टिव्ह राहणाऱ्या रेहानने या निमित्तानं आपला फॅन क्‍लबही वाढवलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.