विद्यार्थिनीला प्राध्यापकाकडून व्हॉट्स अॅपवर अश्लील मॅसेज

अलिगढ मुस्लिम यूनिव्हर्सिटी (एएमयू)मध्ये एका परदेशी विद्यार्थिनिसोबत लैंगिक छळाचा प्रकार समोर आलाय. एमबीए विभागात शिकणाऱ्या इराणच्या रिसर्च स्कॉलर विद्यार्थिनीनं विद्यापीठाच्याच एका प्राध्यापकाविरोधात तक्रार केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 9, 2014, 05:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अलिगढ
अलिगढ मुस्लिम यूनिव्हर्सिटी (एएमयू)मध्ये एका परदेशी विद्यार्थिनिसोबत लैंगिक छळाचा प्रकार समोर आलाय. एमबीए विभागात शिकणाऱ्या इराणच्या रिसर्च स्कॉलर विद्यार्थिनीनं विद्यापीठाच्याच एका प्राध्यापकाविरोधात तक्रार केलीय.
तिच्या मोबाईलवर व्हॉट्स अॅपवर प्राध्यापक अश्लिल मॅसेजेस पाठवत असल्याचा तिचा आरोप आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर जिथं विद्यापीठ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतंय, तिथं विद्यार्थिनिला धमकावण्याचाही प्रकार समोर आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीनं केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, ज्या प्राध्यापकांच्या अंतर्गत ती पीएचडी करतेय, त्याच महाशयांनी मागील काही दिवसांपासून तिला व्हॉट्स अॅपवर काही अश्लिल मॅसेजेस पाठवले आहेत. हे मॅसेजेस दुहेरी अर्थाचेही असल्याचं म्हटलं जातंय. मात्र विद्यार्थिनीच्या मते एका प्राध्यापकानं विद्यार्थिनीला असे मॅसेज पाठवणं चुकीचंच आहे. तिनं विद्यापीठात तक्रार केली मात्र त्यांनी प्राध्यापकाविरोधात कारवाई करण्याऐवजी तिलाच धमकावलं असल्याचं सांगण्यात येतंय.
एसएसपींना भेटली विद्यार्थिनी
विद्यापीठातून आपल्या तक्रारीवर काही कारवाई होत नाहीय असं पाहून विद्यार्थिनीनं एसएसपी नितिन तिवारी यांची भेट घेतली आणि विनंती केली की तिला या प्राध्यापकांच्या हाताखालून काढावं. त्यांनी याबद्दल पोलिसांनकडून रिपोर्ट मागवलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.