Viral news : चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच परतही केलं; तंत्र मंत्रांमुळे...नेमकं काय आहे प्रकरण?

Viral news :  एक अजब चोरीचा प्रकार समोर आलंय. चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच दागिनी परत केलं. असं नेमंक काय घडलं जाणून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. 

नेहा चौधरी | Updated: Nov 12, 2024, 01:14 PM IST
Viral news : चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच परतही केलं; तंत्र मंत्रांमुळे...नेमकं काय आहे प्रकरण?
Virla news After looting 50 tolas of gold the thieves returned it the next day Because of Tantra mantras

Viral news : चोरीचा एक अतिशय विचित्र आणि अजब प्रकार समोर आला आहे. या चोरीचा प्रकार ओटीएसमध्ये पब्लिकेशन ऑफिसर असलेल्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केले. पण दुसऱ्याच दिवशी चोरट्याने महिलेच्या पर्समध्ये 35 तोळे सोन्याचे दागिने परत ठेवलं. 25 ऑक्टोबरला घडलेल्या या प्रकारानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. ओटीएसमध्ये पब्लिकेशन ऑफिसर असलेल्या महिलेने तंत्र मंत्राच्या आधारे आपले सोनं परत मिळवलंय. नेमकं काय आहे प्रकरण जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. (Virla news After looting 50 tolas of gold the thieves returned it the next day Because of Tantra mantras)

Add Zee News as a Preferred Source

ही घटना 25 ऑक्टोबरला प्रकाशन अधिकारी डॉ. अमृत कौर यांच्या घरी चोरी झाली होती. त्या घराबाहेर कुठेतर गेल्या होत्या. घरी परत आल्यानंतर घरात कपाटातील सामान विखुरलेले त्यांना दिसलं. त्यानंतर त्यांनी तपासणी केली असता कपाटात ठेवलेले 50 तोळं सोन्याचे दागिने आणि सुमारे 50 हजार रुपये चोरी गेल्याच त्यांचा लक्षात आलं. यानंतर त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयितांचा शोध सुरू केला असून तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतलं. मात्र, त्यांनी चोरीची कबुली दिली नाही आणि या तिघांनी चोरी केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नसल्याने आता कसं करणार या विचारात असताना. पण संशयाच्या आधारे पोलिसांनी त्या चोरट्यांना पडकलं. झालं असं की, पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावले. यावेळी महिला असे काही बोलली की चोरटे घाबरले आणि दुसऱ्या दिवशी 35 तोळे सोन्याचे दागिने परत केले.

महिलेने तंत्र-मंत्राच्या आधारे सोनं परत मिळवलं...

पोलीस ठाण्यात चोरट्यांना घाबरवण्यासाठी महिलेने त्यांना तंत्रमंत्राद्वारे चोरी कोणी केली हे शोधून काढल्याचे सांगितले. त्यांनी तंत्र-मंत्राद्वारे चोरट्यांचे चेहरे पाण्यात पाहिल्याचे संशयितांना सांगितलं. यानंतर तिन्ही चोरटे घाबरले आणि त्यांनी पोलीस ठाण्यातच कैफियत मांडण्यास सुरुवात केली. पोलिसांकडे पुरावे नसतानाही चोरट्यांना सोडावे लागले, मात्र महिलेच्या बोलण्याने चोरटे इतके घाबरले की त्यांनी दागिने परत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेला तिच्या बागेत एका पर्समध्ये 35 तोळे सोन्याचे दागिने सापडले. अशा प्रकारे महिलेने चोरांचा शोध लावला. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More