नवी दिल्ली : पुणे मेट्रोच्या मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादानं दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा १.७ किलोमीटरचा मार्ग नदीपात्राला लागून जातो. तो झाल्यास नदीच्या प्रवाहाला बाधा पोचेल, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला होता. त्यामुळे या प्रस्तावातल्या बांधकामाविरोधात पर्यावरणप्रेमींनी हरित लवादाकडे धाव घेतली होती. त्यावर सुनावणी घेताना लवादानं मेट्रोच्या नदीला लागून होणा-या कामाला स्थगिती दिली होती.
या निर्णयाविरोधात पुणे महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. त्यावरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ही बंदी उठवलीय.