पंजाब बंदने सामान्यांचे हाल

पंजाबमध्ये शीख दंगल पीडितांनी न्यायाच्या मागणीसाठी पंजाब बंदचं आवाहन केलं. सकाळपासूनच पंजाब बंदचा परिणाम पाहायला मिळतोय. काही ठिकाणी आंदोलकांनी ट्रेन अडवण्याचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत.

Updated: Nov 1, 2014, 05:01 PM IST
पंजाब बंदने सामान्यांचे हाल title=

 

जालंधर : पंजाबमध्ये शीख दंगल पीडितांनी न्यायाच्या मागणीसाठी पंजाब बंदचं आवाहन केलं. सकाळपासूनच पंजाब बंदचा परिणाम पाहायला मिळतोय. काही ठिकाणी आंदोलकांनी ट्रेन अडवण्याचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत.

या बंदमुळं सामान्यांचे हाल झालेत. बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली. बंदचा सगळ्यात जास्त परिणाम जालंधर, अमृतसर आणि लुधियानामध्ये पाहायला मिळतोय.

भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984ला हत्या झाल्यानंतर शीखविरोधी दंगली भडकल्या होत्या.. यांत हजारो शीख नागरिकांची हत्या करण्यात आली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.