नव्या वर्षात २० रुपये किलोने मिळणार डाळ

नव्या आगामी वर्षात पंजाब सरकार २० रुपये प्रति किलोने डाळ विकणार आहे. सरकारची ही योजना जुनी असली तरी गेल्या दीड वर्षांपासून ती बंद होती. नीळे कार्ड असणाऱ्यांना ही स्वस्त डाळ मिळणार आहे. 

Updated: Dec 3, 2015, 10:22 AM IST
नव्या वर्षात २० रुपये किलोने मिळणार डाळ

चंदीगड : नव्या आगामी वर्षात पंजाब सरकार २० रुपये प्रति किलोने डाळ विकणार आहे. सरकारची ही योजना जुनी असली तरी गेल्या दीड वर्षांपासून ती बंद होती. नीळे कार्ड असणाऱ्यांना ही स्वस्त डाळ मिळणार आहे. 

पंजाब सरकारने निळ्या कार्डधारकांसाठी दोन रुपये किलो गहू आणि २० रुपये किलोने डाळ देण्याची योजना बनवली होती. मात्र गेल्या दीड वर्षांपासून १५.२० लाख निळ्या कार्डधारक नागरिकांना याचा फायदा मिळालेला नाही. ही योजना आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. 

या योजनेसाठी ४०० कोटी रुपये देण्यास वित्त विभागाने तयारी दर्शवली आहे. यामुळे पुढील वर्षी जानेवारीपासून निळ्या कार्डधारकांनी २० रुपये किलोने डाळ मिळणार आहे. पहिल्या तीन महिन्यांत १०० कोटींचे वितरण केले जाईल. त्यानंतर उरलेले ३०० कोटी रुपये बजेटमध्ये सामाविष्ट करण्यात येतील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.