'व्यसन, प्रेम प्रकरणांमुळे होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या'

पदं बदलली की विचार आणि संवेदनक्षतेतही बदल होतात की काय? असा विचार करायला लावणार प्रश्न केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याबाबतीत तुम्हालीही पडू शकतो...

Updated: Jul 24, 2015, 06:29 PM IST
'व्यसन, प्रेम प्रकरणांमुळे होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या' title=

नवी दिल्ली : पदं बदलली की विचार आणि संवेदनक्षतेतही बदल होतात की काय? असा विचार करायला लावणार प्रश्न केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याबाबतीत तुम्हालीही पडू शकतो...

शेतकरी आत्महत्या या व्यसनाधीनता, प्रेम प्रकरणं यातून होत असल्याची मुक्ताफळं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी आज संसदेत उधळलीत. 

धक्कादायक बाब म्हणजे लोकशाहीचं मंदीर असलेल्या राज्यसभेत त्यांनी देशातल्या बळीराजाच्या परिस्थितीची क्रूर चेष्टाच केलीय. 

विशेष म्हणजे राधामोहन सिंग यांना त्यांच्या लेखी उत्तराबाबत विचारले असता त्यांनी एनसीआरबी अर्थात नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोनं दिलेल्या आकडेवारीचं समर्थन करत सरकारकडे त्याचार आधार असल्याचं अजब वक्तव्यही केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.